सांगोला तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; पीक नुकसानीची केली पाहणी
सांगोला : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांनी गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर २०२६) सांगोला तालुक्याचा दौरा केला.
यावेळी त्यांनी विविध गावांमध्ये शेतांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाणीचिंचाळे, वाकी-घेरडी, बुरलेवाडी, राजापूर आणि वाढेगाव या गावांना भेटी देऊन शेती व पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी, पिकांची झालेली हानी आणि आवश्यक मदतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली.
दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी झाल्याने नुकसानीची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली.
या दौऱ्यावेळी मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी, सांगोल्याचे तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी (बीडीओ), पशुवैद्यकीय अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव तसेच कृषी सहाय्यक उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रशासनाकडून थेट आढावा घेण्यात आला असून,
शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.




0 Comments