गांधी जयंतीनिमित्त सांगोल्यातील साहित्यिकांचा गौरव; रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
सांगोला : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत माजी खासदार तथा माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी
सांगोला तालुक्यातील कवी, साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांची सदिच्छा भेट घेत त्यांचा सन्मान केला.
समाजप्रबोधन, मराठी भाषेचे संवर्धन आणि साहित्य निर्मितीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
कवी आणि साहित्यिक हे आपल्या लेखणीतून समाजातील वास्तव, विविध प्रश्न, भावना आणि सामाजिक परिस्थिती प्रभावीपणे मांडण्याचे काम करतात. त्यांच्या साहित्यामुळे समाजात विचारांची देवाणघेवाण होऊन
सामाजिक जाणीव निर्माण होण्यास हातभार लागतो. त्यामुळे साहित्यिकांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून सांगोला तालुक्यातील साहित्यिकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये संवाद साधला गेला.
यावेळी प्रा. विश्वनाथ आव्हाड, महेश नलवडे, चिटणीस दादाशेठ बाबर, अनिल जगदाळे, सुरेश पवार, सरपंच नामदेव पवार, धनश्री पवार, उद्धव पाटील, भीमाशंकर पैलवान सर, प्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे
, राहुल चव्हाण, माजी सरपंच महादेव पवार, माजी सरपंच विजय पवार, माजी सरपंच आळसुंदकर, अशोक पाटील गुरुजी, बाजार समिती संचालक धनाजी पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या साहित्यिकांचा झाला गौरव :
सुनील जवंजाळ, सागर भजनावळे, फारुख काझी, प्रेमकुमार वाघमारे, शिवाजी बंडगर, ज्योतीराम फडतरे, अॅड. महादेव कांबळे, ज्ञानेश्वर डोंगरे आणि होवाळ यांचा सन्मान करण्यात आला.


0 Comments