Breaking News

फर्जी पत्रकार आणि बनावट न्यूज चॅनेलविरोधात देशभर कारवाई; एफआयआर दाखल होणार

फर्जी पत्रकार आणि बनावट न्यूज चॅनेलविरोधात देशभर कारवाई; एफआयआर दाखल होणार


नवी दिल्ली : देशभरात पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांच्या नावाखाली सुरू असलेल्या 


बनावट कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्याची तयारी करण्यात येत आहे. 

माहिती व प्रसारण मंत्रालयाने फर्जी पत्रकार तसेच बनावट वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे.

माहिती व प्रसारण मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना देशभरात काही लोक प्रेसचे बनावट ओळखपत्र घेऊन फिरत असल्याचे सांगितले. 

तसेच काही जण फर्जी चॅनेल चालवत असल्याची माहिती समोर आली असून, अशा प्रकरणांची तातडीने चौकशी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 काही चुकीच्या व्यक्तींमुळे चांगले, सच्चे आणि प्रामाणिक पत्रकार बदनाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

प्रेसच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगला आळा

प्रेसच्या नावाचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार सुरू असल्याचेही समोर आले आहे. बनावट पत्रकारांकडून व्यक्ती,

 संस्था किंवा व्यावसायिकांकडे दबाव निर्माण करून पैसे उकळण्याचे प्रकार होत असल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या वृत्तपत्रे, नियतकालिके

 आणि न्यूज पोर्टल्सच्या माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांची नियुक्ती संबंधित संस्थांकडून केली जाऊ शकते.

 मात्र, नोंदणी नसलेल्या किंवा नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या न्यूज पोर्टल्स अथवा सोशल मीडिया चॅनेलच्या नावावर पत्रकार नियुक्त करण्याबाबत कारवाई होऊ शकते.

फर्जी प्रेस कार्ड, बनावट वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पत्रकार असल्याचे भासवून गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली

 जाणार असल्याने अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments