Breaking News

‘वर्षा’वर गणरायाची आरती करण्याचा मुक्ताई गायकवाड यांना मान; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत लाभला अविस्मरणीय क्षण


‘वर्षा’वर गणरायाची आरती करण्याचा मुक्ताई गायकवाड यांना मान; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत लाभला अविस्मरणीय क्षण


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाची आरती करण्याचा मान सौ. मुक्ताई गायकवाड यांना मिळाला.


 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या आरतीमुळे गायकवाड कुटुंबासाठी हा क्षण विशेष आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला.

गणरायाच्या भक्तिमय वातावरणात आरती करण्याची संधी मिळाल्याने मुक्ताई गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी हा प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहणारा असल्याची भावना व्यक्त केली.

‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाच्या चरणी लाभलेला हा मंगलमय क्षण म्हणजे श्री गणरायाचा आशीर्वाद आणि कुटुंबासाठी जपून ठेवावा असा अनमोल ठेवा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“गणपती बाप्पाच्या साक्षीने मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी अविस्मरणीय आहे,” अशी भावना गायकवाड कुटुंबीयांनी व्यक्त केली.

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

Post a Comment

0 Comments