Breaking News

डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल

डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं,


सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल

डोळ्यादेखत उभं पीक जळून गेलं... वर्षभराचा खर्च कसा भागवायचा? मुलांचं शिक्षण, दवाखाना

 आणि रोजचा घरखर्च कसा चालवायचा? सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता हेच प्रश्न उभे ठाकले आहेत.

कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोल्याला यंदाही पावसाच्या कमतरतेचा मोठा फटका बसला आहे.

 सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात आचकदाणी गावातील शेतकरी विलास चव्हाण यांच्या शेतात दुष्काळाची भीषणता पाहायला मिळते आहे.

वर्षाचा खर्च भागला असता, सगळी पिकं जळाली..

शेतकरी विलास चव्हाण यांनी आपल्या शेतात माक्यासोबत 26 गुंठ्यात डाळिंबाचे पीक घेतले होते. पाणी कमी पडेल म्हणून अगदी ठिबक सिंचनने पाणी दिले 

मात्र पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने डोळ्यादेखत डाळिंबाचे उभे पीक पूर्ण जळून गेले. मका आधीच जळून गेला होता. 

ज्यावर वर्ष काढायचे स्वप्न विलास चव्हाण बघत होते ते डाळिंबही पूर्ण जळून गेल्याने हे कुटुंब हातबल झालं आहे. 

डाळिंबातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्नाला असतं. यंदा भावही चांगली होते, संपूर्ण वर्षाचा खर्च यातून भागू शकला असता;

 पण आता सप्टेंबर चालू आहे आणि आता पुढच्या मृग नक्षत्रापर्यंत दिवस कसे काढायचे आणि जगायचे कसे?

 असा प्रश्न चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पडलाय.उभ्या आयुष्यात इतकी भीषण परिस्थिती पाहिली नाही, बळीराजा गहिवरला..

मुलांची शिक्षण दवाखान्याचा खर्च आणि रोजचा खाण्यापिण्याचा खर्च या डाळिंबाच्या उत्पन्नातून भागू शकला असता.

 पण आता फारच मुश्किल बनल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने दुष्काळ तर जाहीर केला पण नुसता जीआर काढून काय होणार? 

आता खऱ्या अर्थाने भरीव मदत झाली तर आम्ही यातून बाहेर पडू, अन्यथा या भीषण दुष्काळात आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं ते म्हणाले. 

आपल्या उभ्या आयुष्यात इतकी भीषण परिस्थिती कधी पाहिली नसल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

 सांगोला तालुक्यात सध्या सप्टेंबरमध्येच जवळपास 22 टँकर सुरू झाले असून दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढू लागली आहे.

 अशा अवस्थेत ना पिण्याला पाणी ना शेतात पीक आणि पुढचे वर्ष कसे काढायचे हा प्रश्न सध्या बळीराजाला सतावू लागला आहे.

Post a Comment

0 Comments