Breaking News

तिसंगी तलावात अखेर पाण्याची ‘धार’! आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या पाठपुराव्याला यश

तिसंगी तलावात अखेर पाण्याची ‘धार’! आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या पाठपुराव्याला यश


सांगोला : तिसंगी तलावात पाणी सोडण्याची प्रतीक्षा अखेर संपली असून, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तलावात 

पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे तिसंगी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले.

 विविध स्तरांवर पाठपुरावा करत त्यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून तिसंगी तलावातही पाणी सोडण्यात आले.

तिसंगी तलावात पाणी दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

 तलावातील पाण्यामुळे शेतीसह परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे तिसंगी तलावात पाणी पोहोचल्याने “पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार” अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

त्यांच्या रूपाने स्वर्गीय आबांच्या कार्याची आठवण होत असल्याची भावनिक प्रतिक्रिया तिसंगी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

तलावात पाणी पोहोचल्याने तिसंगीकरांच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली

 असून, पाण्यामुळे आगामी काळात शेतीला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments