Breaking News

लक्ष्मीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माध्यमिक विद्यालयाने मारली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत बाजी

लक्ष्मीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माध्यमिक विद्यालयाने मारली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत बाजी


 सांगोला - ग्रामविकास मंडळ लक्ष्मीनगर संचलित माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगरच्या विद्यार्थ्यांनी सांगोला येथे नुकत्याच पार

 पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दमदार कामगिरी करत गावाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

या स्पर्धेत विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर धडक मारली आहे. 

तर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

ग्रामीण भागातील जिद्दी खेळाडूंनी शहरातील मोठ्या शाळांना मागे टाकत हे यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक अशोक नरळे सर, 

दत्तात्रेय बेंदगुडे सर तसेच मार्गदर्शक शिक्षक राकेश पवार सर, व विजय गोडसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे 

माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगर व सर्व ग्रामस्थ लक्ष्मीनगर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत

 असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments