Breaking News

शब्दरेखा एक्स्प्रेस/समता नगरी संपादक मा. संतोष साठे यांच्यावर द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघाची मोठी जबाबदारी; सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड

 शब्दरेखा एक्स्प्रेस/समता नगरी संपादक मा. संतोष साठे यांच्यावर द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया  पत्रकार महासंघा


ची मोठी जबाबदारी; सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड

सांगोला : द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघाच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी पत्रकार संतोष साठे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून तसेच सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष साठे यांनी सांगोला तालुक्यातील स्थानिक प्रश्न, जनतेच्या समस्या, सामाजिक

 विषय आणि विविध सार्वजनिक प्रश्नांना सातत्याने आपल्या लेखणीतून वाचा फोडली आहे. 

सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत 

पत्रकार महासंघाने त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

सांगोला तालुक्यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळावे, पत्रकारांच्या हक्क व हितासाठी प्रभावीपणे काम व्हावे,

 तसेच सामाजिक प्रश्नांवर पत्रकारांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका मांडली जावी, 

यासाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघाचे 

सांगोला तालुक्यातील संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित गायकवाड पाटील यांनी 

संतोष साठे यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छुक : राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदासजी ताटे साहेब

अजित गायकवाड पाटील

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

द जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया पत्रकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत कोळी

Post a Comment

0 Comments