स्वातंत्र्यदिनाचा आनंद मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत; ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्सचा स्तुत्य उपक्रम
सांगोला : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्स, सांगोला यांच्या वतीने मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना स्कूल बॅग, विविध शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य आणि भेटवस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी उद्योजक अनिल भाऊ दिघे, शोरूम मॅनेजर दीपक पोरे, बाळासाहेब मोरे, Solis कंपनीचे एरिया मॅनेजर पुष्कर पराडे, सुनील बोराडे, रामदास चौधरी, तानाजी दरगुडे, अजय रुपटक्के तसेच अथर्व पवार यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या उपक्रमाचे खरे समाधान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
Solis Yanmar Family यांच्या वतीने ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
“सेवा हीच खरी मानवता; समाजासाठी उचललेले प्रत्येक छोटे पाऊल हे मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असते.”


0 Comments