Breaking News

सांगोल्यात जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

सांगोल्यात जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन


बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

सांगोला (विशेष प्रतिनिधी): परस्पर जमीन खरेदी केल्याने आपले कमिशन बुडाले, या निष्कारण रागातून एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा हात फॅक्चर केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यात घडली आहे.

 याप्रकरणी शनिवारी सांगोला पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नितीन शहाजी पुजारी (वय – रा. चिकमहूद, ता. सांगोला) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 तर संतोष आत्माराम गोडसे आणि सुखदेव अर्जुन गोडसे (दोघेही 

रा. महूद, ता. सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.नक्की काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नितीन पुजारी हा आपल्या दुचाकीवरून जात होता. 

दरम्यान, आरोपी संतोष गोडसे आणि सुखदेव गोडसे यांनी त्याला रस्त्यात अडवले.”तुला लई मस्ती आली आहे, तुझ्यामुळे आमचे कमिशन बुडाले” 

असा जाब विचारत दोघांनी नितीनला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

वाद वाढल्याने रागाच्या भरात आरोपींनी थेट कोयत्याने त्याच्यावर वार केले. या अचानक झालेल्या भयंकर हल्ल्यात नितीनचा हात फॅक्चर झाला.मध्यस्थी अन् जिवे मारण्याची धमकी:

घटनास्थळी आरडाओरड झाल्यानंतर मनीषा गोडसे व त्यांचा मुलगा नाथा गोडसे यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि भांडण सोडवले.यानंतर

 “पुन्हा आमच्या नादाला लागू नकोस, नाहीतर गाठ आमच्याशी आहे” अशी धमकी देत आरोपींनी तिथून काढता पाय घेतला.

या घटनेनंतर जखमी नितीनवर उपचार करण्यात आले. शनिवारी त्याने दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी 

आरोपी संतोष गोडसे आणि सुखदेव गोडसे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments