Breaking News

"शेवटच्या शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचेपर्यंत लढा सुरूच!" – ३४व्या पाणी संघर्ष परिषदेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा निर्धार

"शेवटच्या शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचेपर्यंत लढा सुरूच!"


– ३४व्या पाणी संघर्ष परिषदेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा निर्धार

मंगळवेढा : जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे स्वर्गीय नागनाथ अण्णा आणि आ.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांनी उभी केलेल्या पाणी चळवळीचा वारसा जपत ३४ वी पाणी संघर्ष परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

परिषदेत बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनावर भर देत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. 

"पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. 

फाटा क्रमांक ४ व ५ बारामाही करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शेवटच्या शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचेपर्यंत ही चळवळ थांबणार नाही," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेला आमदार समाधानदादा आवताडे, निमंत्रक वैभवदादा नायकवडी यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, सांगोला तालुक्यातील हजारो शेतकरी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेत सहभागी झाले.

 पाणी प्रश्नावर एकजूट दाखवत शेतकऱ्यांनी चळवळीला भक्कम पाठिंबा दिला. पाण्याच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments