Breaking News

महायुतीची एकजूट! राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी सांगोल्यात रणनिती बैठक

महायुतीची एकजूट! राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी सांगोल्यात रणनिती बैठक



सांगोला | प्रतिनिधी सोलापूर विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी सांगोल्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या ‘आबासाहेब’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत शेकाप आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला.

बैठकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आगामी निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना विजयी करण्यासाठी गावपातळीवर प्रभावी संपर्क अभियान राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत, आमदार विजय (मालक) देशमुख, माजी आमदार प्रशांत (मालक) परिचारक, बाळासाहेब (मालक) एरंडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सभापती चेतनसिंह केदार, 

श्रीकांत दादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, किरण पांढरे, सिंधुताई आलदर, संगीता मोटे, युवा नेते सोमा आबा मोटे, मोहन बापू आलदर यांच्यासह शेकाप-भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते.

निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावा, यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 बैठकीत स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, प्रचाराची दिशा आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

"महायुती एकदिलाने, राजेंद्र राऊत विजयी करण्यासाठी सज्ज!" असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments