Breaking News

RPI(आ) प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त भीमनगर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

RPI(आ) प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त भीमनगर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप


सांगोला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त 

सांगोला येथील भीमनगर परिसरातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

 यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजाभाऊ सरवदे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RPI(आ) प्रदेशाध्यक्ष राजाभाव सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मा. दामोदर (आण्णा) साठे,

 RPI(आ) उप. जिल्हाध्यक्ष मा.अरुण (अण्णा) बनसोडे, RPI(आ) युवक जिल्हाध्यक्ष मा.रामस्वरुप (बापू) बनसोडे, 

युवा नेते मा.एकनाथ बनसोडे, यांच्या हस्ते बनसोडे मॅडम व गायकवाड मॅडम यांच्या उपस्थितीत खाऊ वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले..

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

 सामाजिक उपक्रमातून आनंद वाटण्याची ही भावना प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments