Breaking News

सांगोल्याच्या ग्रामीण विकासाला मोठी चालना! आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा

सांगोल्याच्या ग्रामीण विकासाला मोठी चालना! आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख


यांच्या पाठपुराव्यामुळे सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, तालुक्यातील सात प्रमुख रस्त्यांना ग्रामीण मार्ग (Gramin Marg) म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. 

या निर्णयामुळे संबंधित रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एकूण १४.५० किलोमीटर लांबीचे रस्ते ग्रामीण मार्ग योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. 

या मंजुरीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग (NH-965) मेथवडे फाटा (कॅनॉलपुल) ते प्रजिमा-१६३ जोडरस्ता, संगेवाडी–मेथवडे, संगेवाडी–रोटफळ, तुळशीराम पवार वस्ती ते पाटील गणपत्ये वस्ती जोडरस्ता, वाटंबरे–अकोला मार्गाला जोडणारा

 रस्ता, मेढशिंगी–हुलगेवाडी डांबरीकरण रस्त्यापासून लेंडवे चिंचोळे शिवारापर्यंतचा रस्ता तसेच एखतपूर गावठाण ते डी.एड. कॉलेज हा रस्ता यांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. 

शेतीमालाची वाहतूक सुलभ होण्यासह गावागावांतील संपर्क अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे परिणामी रस्ते विकास योजना २००९-२१ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण मार्गांची एकूण लांबी ६६५७.२३ किलोमीटरवरून ६६७१.७३ किलोमीटरपर्यंत वाढली असून, त्यात सांगोला तालुक्यातील १४.५० किलोमीटर रस्त्यांचा नव्याने समावेश झाला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा मिळावी, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना यश मिळाले असून,

 आता या रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू राहतील.”

या मंजुरीबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय सांगोला तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून,

 आगामी काळात या रस्त्यांच्या उन्नतीकरणामुळे ग्रामीण विकासाला निश्चितच अधिक गती मिळेल.

Post a Comment

0 Comments