Breaking News

सांगोल्यात बेकायदेशीर लिंगनिदान प्रकरणाचा पर्दाफाश; मुख्य आरोपीला अटक, वैद्यकीय साहित्य जप्त

सांगोल्यात बेकायदेशीर लिंगनिदान प्रकरणाचा पर्दाफाश; मुख्य आरोपीला अटक, वैद्यकीय साहित्य जप्त


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यात बेकायदेशीर लिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 या प्रकरणातील मुख्य आरोपी भास्कर (बापू) रामचंद्र घाडगे याला अटक करण्यात आली 

असून, वाकी (शिवणे) येथील त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात लिंगनिदानासाठी वापरले जाणारे विविध वैद्यकीय साहित्य आणि उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

५ ऑगस्ट २०२६ रोजी सांगोला पोलिस आणि कोल्हापूर येथील विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत ही धाड टाकली. कारवाईदरम्यान अल्ट्रासाऊंड मशीन, 

अल्ट्रासाऊंड प्रोब, फिटल डॉप्लर मशीन, अल्ट्रासाऊंड जेल, वैद्यकीय साहित्य, सीडी, रिपोर्ट्स, नोंदी, रजिस्टर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलांच्या गर्भातील लिंग निश्चित करून त्याबदल्यात मोठी रक्कम घेत असल्याचा आरोप आहे.

 या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.

विशेष म्हणजे, आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक होऊन कारावास भोगल्याची माहिती समोर आली आहे.

 तुरुंगातून सुटल्यानंतरही त्याने पुन्हा हा अवैध व्यवसाय सुरू केल्याचा संशय तपासातून व्यक्त केला जात आहे.

या रॅकेटमध्ये काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती किंवा डॉक्टरांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू असून, 

पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गर्भलिंग निदान करणे आणि त्यासाठी मदत करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती तात्काळ पोलिस किंवा संबंधित प्रशासनाला द्यावी.

जप्त करण्यात आलेले साहित्य

अल्ट्रासाऊंड मशीन

अल्ट्रासाऊंड प्रोब

फिटल डॉप्लर मशीन

अल्ट्रासाऊंड जेल

वैद्यकीय साहित्य

सीडी व रिपोर्ट्स

नोंदी व रजिस्टर

इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे

"बेटी बचाव, बेटी पढाव" हा केवळ संदेश नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. 

गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments