Breaking News

शिवसेना सोशल मीडिया सोलापूरची जबाबदारी पुन्हा अमित पाटील यांच्याकडे; जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया सोलापूरची जबाबदारी पुन्हा अमित पाटील यांच्याकडे; जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती


सोलापूर | प्रतिनिधी शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी अमित हनमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि

 खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. राज्य सोशल मीडिया प्रमुख प्रतीक शर्मा तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख महादेव सरवदे यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी अमित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अमित पाटील यांनी यापूर्वी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख म्हणून काम करताना सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये संघटनात्मक जाळे मजबूत केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान महायुती

 सरकारच्या विविध योजना व पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सोशल मीडियावर विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचाराला तथ्याधारित उत्तर देत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली.

डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून युवा कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, अधिकृत माहितीचे वेगवान प्रसारण करणे आणि जिल्ह्यातील विकासकामांना सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी मिळवून देणे हे त्यांच्या कार्याचे विशेष वैशिष्ट्य मानले जाते.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमित पाटील म्हणाले की, "मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा डिजिटल आवाज अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन."

त्यांच्या नियुक्तीचे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चौकट :

डिजिटल माध्यमातून शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी नवी जबाबदारी; कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Post a Comment

0 Comments