डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
सांगोला : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पांडुरंग रुपनर हे होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर धसाडे होते. यावेळी संस्था सदस्य
प्रा. अशोकराव शिंदे, संस्था सदस्य प्रा. दीपकराव खटकाळे तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. माने सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पांडुरंग रुपनर यांनी आपल्या मनोगतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण, सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. शंकर धसाडे यांनी शाहू महाराजांचे लोकहितवादी कार्य, सामाजिक परिवर्तनासाठीचे योगदान आणि समाजसेवेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जगन्नाथ ठोंबरे यांनी केले.
या कार्यक्रमास सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत भैय्या देशमुख यांचे तसेच संस्था सदस्य मा. विठ्ठलराव शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


0 Comments