Breaking News

डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात राज्यस्तरीय मॅरेथॉन; ‘धावा आरोग्यासाठी, धावा उज्ज्वल भविष्यासाठी!’

डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात राज्यस्तरीय मॅरेथॉन;


‘धावा आरोग्यासाठी, धावा उज्ज्वल भविष्यासाठी!’

सांगोला : राष्ट्रीय डॉक्टर्स डेचे औचित्य साधत सांगोला शहरात आरोग्य, फिटनेस आणि जनजागृतीचा अनोखा उत्सव रंगणार आहे. सांगोला डॉक्टर असोसिएशन आणि सूर्योदय परिवार

 यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै २०२६ (बुधवार) रोजी भव्य राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे रिपोर्टिंग सकाळी ५.०० वाजता, तर मॅरेथॉनला ६.०० वाजता सुरुवात होईल. प्रारंभ व समाप्ती स्व. डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय पटांगण (एस.टी. स्टँड समोर), सांगोला येथे होणार आहे. 

मॅरेथॉनचा मार्ग वासुद रोड, माण नदी व वासुद गाव मार्गे पुन्हा महाविद्यालयाच्या पटांगणापर्यंत असा निश्चित करण्यात आला आहे.

स्पर्धा ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर या दोन गटांत होणार असून नोंदणी शुल्क ₹३०० ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मॅरेथॉन टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि अल्पोपहार देण्यात येणार 

असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेदरम्यान आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

राज्यभरातील धावपटू, युवक-युवती, विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि फिटनेसप्रेमी नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. "एक पाऊल आरोग्याकडे...

 एक धाव निरोगी भारताकडे!" या संदेशातून नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आयोजित हा आरोग्यदायी उपक्रम केवळ मॅरेथॉन स्पर्धा नसून समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा लोकचळवळीचा उत्सव ठरणार

 असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments