Breaking News

सांगोल्याच्या राजकारणाला नवे वळण! शेकापसह विविध पक्षांतील ४५० हून अधिक कार्यकर्ते शिवसेनेत

 सांगोल्याच्या राजकारणाला नवे वळण! शेकापसह विविध पक्षांतील ४५० हून अधिक कार्यकर्ते शिवसेनेत


मुंबई/सांगोला | दि. १८ ऑगस्ट २०२६

सांगोला तालुक्याच्या राजकीय पटलावर मंगळवारी मोठी घडामोड घडली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मलबार हिल येथील

 नंदनवन निवासस्थानी शेतकरी कामगार पक्षासह विविध राजकीय पक्षांतील ४५० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रवेश सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यातून तब्बल १०० हून अधिक वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला होता. भगवे झेंडे, बॅनर आणि स्टिकरने

 सजलेल्या वाहनांसह कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली. ढोल-हालग्यांच्या गजरात आणि घोषणांच्या उत्साहात प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पारंपरिक पद्धतीने धनगरी फेटा, घोंगडी आणि काठी देऊन स्वागत करण्यात आले.

धायटीपासून घेरडीपर्यंत कार्यकर्त्यांचा सहभाग

धायटी गावातील माजी सरपंच रवी भाऊ मेटकरी यांच्यासह शत्रुघ्न कोळेकर, दादासो सरगर, प्रशांत येडगे, बिरुदेव सरक, ईश्वर सरगर, आबासाहेब जगदाळे, सिद्धेश्वर जगदाळे, 

माणिक सरगर, नामदेव सरक, अमित सरगर, सनी बनसोडे, पांडुरंग बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

घेरडी गटातील बंडू मामा मोटे यांच्या नेतृत्वाखाली हंगिरगे, काळेवाडी, नराळे, पारे, डिस्कळ आणि सोनंद या गावांतील ४० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले.

याशिवाय सांगोला शहरातील उद्योगपती मनोज ढोबळे यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने, तर चिंचोली, कमलापूर, शिवणे, 

हलदहिवडी, शिरभावी, एकतपूर, महूद बु., महिम, कटफळ आणि वझरे या गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दत्तात्रेय सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांसह 

बलवडी, नाझरे, अजनाळे आणि तिसंगी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.

शिंदे : सांगोल्याच्या प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याचा शब्द

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सांगोला तालुक्यातील शहाजीबापू पाटील 

आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रयत्न करू.

 सांगोल्यासमोर भविष्यात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहाजीबापू पाटील यांचा विकासाचा निर्धार

आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास हे आपले 

प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. तालुक्यातील तरुणांची मोठी फळी उभी करून विकासाचे विधायक राजकारण आणि समाजकारण करण्याचा निर्धार 

त्यांनी व्यक्त केला. निर्णय प्रक्रियेत सर्व समाजातील तरुणांना सहभागी करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रवेश सोहळ्यास धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार निलेश राणे, सोलापूर जिल्हा निरीक्षक आमदार संजय कदम, महिला आघाडीच्या 

नेत्या साईना एनसी यांच्यासह सांगोला नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, युवा सेनेचे सचिव सागर पाटील, उपनगराध्यक्ष नितीन इंगवले, नगरसेवक, 

पंचायत समितीचे पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी तसेच विविध गावांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले, तर आभार उद्योगपती मनोज ढोबळे यांनी मानले.

आगामी राजकारणाची दिशा बदलणार?

एकाच वेळी विविध गावांमधील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा सांगोला तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचा शिवसेनेला कितपत राजकीय फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments