Breaking News

वटपौर्णिमेला महिलांसाठी सुवर्णसंधी! Reel बनवा, पर्यावरणाचा संदेश द्या आणि जिंका ₹5 हजारांचे बक्षीस नगरसेविका आशाताईं सोमेश यावलकर

वटपौर्णिमेला महिलांसाठी सुवर्णसंधी! Reel बनवा, पर्यावरणाचा संदेश द्या


आणि जिंका ₹5 हजारांचे बक्षीस नगरसेविका आशाताईं सोमेश यावलकर 

सांगोला : वटपौर्णिमा उत्सवानिमित्त महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, 

या उद्देशाने सांगोल्यात आगळीवेगळी Reel स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. "सर्वगुण संपन्न, दीर्घायुषी वटवृक्ष, ज्यामुळे लाभले निरोगी आयुष्य!" या संकल्पनेवर आधारित स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ₹5,000, द्वितीय ₹4,000, तृतीय ₹3,000, तर उत्तेजनार्थ ₹2,000 आणि ₹1,000 अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र तसेच वडाचे रोप भेट म्हणून दिले जाणार आहे. सहभागी स्पर्धकांनी 70 ते 100 सेकंदांची Reel तयार करून ती सोशल मीडियावर पोस्ट करायची असून, त्यासोबत 8390641064 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवायची आहे.

Reel पाठविण्याची अंतिम मुदत 30 जून (मंगळवार) सायंकाळी 8 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या उपक्रमाचे आयोजन सौ. आशादेवी सोमेश यावलकर, नगरसेविका, सांगोला नगरपरिषद तथा सदस्य, अर्थ व नियोजन समिती यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होत वटवृक्षाचे महत्त्व, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments