Breaking News

निवडणुकीत जाहिरातींची धूम, निवडून झाल्यानंतर बिलांचा विसर? युट्यूब चॅनेल आणि वृत्तपत्रांतून प्रसिद्धी करून घेतली; आता ‘आज देतो, उद्या देतो’ची टोलवाटोलवी

निवडणुकीत जाहिरातींची धूम, निवडून झाल्यानंतर बिलांचा विसर? युट्यूब चॅनेल आणि वृत्तपत्रांतून प्रसिद्धी करून घेतली; आता ‘आज देतो, उद्या देतो’ची टोलवाटोलवी


तालुका प्रतिनिधी | तालुक्यात सध्या एका स्थानिक नेत्याच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकारांकडून बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध करून

 घेतल्यानंतर संबंधित जाहिरातींच्या बिलांच्या देयकाबाबत मात्र वारंवार टोलवाटोलवी केली जात असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये आहे.

निवडणुकीच्या काळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी पत्रकारांकडून जाहिराती आणि बातम्या प्रसिद्ध करून घेण्यात आल्या. 

मात्र निवडणूक झाल्यानंतर संबंधित बिलांच्या देयकासाठी पत्रकारांनी पाठपुरावा केला असता,

 ‘आज देतो’, ‘उद्या देतो’, ‘लवकरच देतो’ अशा आश्वासनांवर वेळ मारून नेली जात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे.

महिने उलटूनही देयके प्रलंबित राहिल्याने पत्रकार आणि संबंधित माध्यम प्रतिनिधींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रसिद्धीच्या वेळी पत्रकारांची गरज असते;

 मात्र बिल देण्याची वेळ आली की टाळाटाळ का केली जाते, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, या नेत्याचे राजकीय वजन मोठे असल्याचे सांगितले जात असले तरी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनाही फारसे महत्त्व दिले जात नसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

 त्यामुळे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशी कुजबुजही राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात ऐकायला मिळत आहे.

पत्रकारांकडून प्रसिद्धी करून घेतल्यानंतर त्यांचे मेहनताना किंवा जाहिरातीचे बिल वेळेत अदा करणे ही व्यावसायिक जबाबदारी आहे.

 त्यामुळे पत्रकारांच्या कष्टाचे पैसे रोखून ठेवून त्यांना वारंवार आश्वासनांच्या फेऱ्यात का अडकवले जात आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

दरम्यान, संबंधित नेत्याने या आरोपांबाबत आपली बाजू स्पष्ट करणे अपेक्षित आहे. 

तालुक्यातील पत्रकारांनीही जाहिरात किंवा प्रसिद्धी स्वीकारताना आर्थिक व्यवहार स्पष्ट करूनच काम करावे, अशी चर्चा आता माध्यम क्षेत्रात सुरू झाली आहे.

‘प्रसिद्धी हवी तेव्हा पत्रकार जवळचे; बिलाची वेळ आली की पत्रकारांना टाळाटाळ’ — या कथित प्रकारामुळे संबंधित नेत्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 वृत्तपत्राचा युट्युब चॅनेल चा  जाहिरात प्रसिद्ध करण्याचा खर्च पत्रकारांनी त्याच्या कुटुंबाच्या 

आर्थिक खर्चातून केलेला असतो पुढील बिल न मिळण्यास त्यास किती नुकसान होते याची जाणीव असावी.

 अशा लोकांपासून नागरिकांनी सावधान राहावी अशी चर्चा होत आहे

(भाग 1)

लवकरच भाग दोन नावासहित

Post a Comment

0 Comments