सांगोला-कडलास मार्गावर अपघात; दांपत्याचा मृत्यू, गरोदर पत्नीसह उपचारासाठी जाताना काळाचा घाला!
सांगोला : सांगोला- कडलास मार्गावरील माण नदीजवळ शनिवारी (ता. २७) दुपारी दुचाकी व ट्रेलर यांच्यात झालेल्या
भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गरोदर असलेल्या पत्नीला उपचारासाठी सांगोल्यात घेऊन येत असताना हा अपघात घडला.
सागर भारत जाधव (वय २७) व सुजाता सागर जाधव (वय २४, दोघे रा. वाकी (शिवणे), ता. सांगोला) हे दुचाकीवरून कडलासहून सांगोल्याकडे येत होते.
दुपारी सुमारे २.४० वाजता माण नदीजवळ सांगोल्याकडून कडलासकडे जाणाऱ्या ट्रेलरने (जीजे ०५ सीवाय १३३९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अमोल नानसाहेब जाधव यांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.


0 Comments