Breaking News

सांगोल्यात हृदयद्रावक घटना! कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सांगोल्यात हृदयद्रावक घटना! कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू


सांगोला : घराजवळ खेळत असताना नीरा उजव्या कालव्यात पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पार्थ प्रशांत गव्हाणे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 

ही हृदयद्रावक घटना शनिवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अकोला (ता. सांगोला) येथील शिंदे-गव्हाणे वस्तीवर घडली.

सांगोला येथील प्रशांत गव्हाणे यांचे अकोला येथील शिंदे-गव्हाणे वस्तीवर सांगोला शाखा कालवा क्रमांक ५ लगत घर आहे. शनिवारी सायंकाळी पार्थ घराच्या परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो कालव्याजवळ गेला आणि अचानक पाण्यात पडला.

कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने पार्थ पाण्यासोबत वाहत गेला. घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर विठ्ठल शिंदे यांच्या कालव्यालगतच्या घराजवळ तो वाहून गेला. यावेळी शेळ्या राखण्यासाठी गेलेल्या एका महिलेला चिमुकला कालव्याच्या पाण्यात दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या दुर्दैवी घटनेत पार्थचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूने गव्हाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments