Breaking News

नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात आरोग्यसेवेचा महायज्ञ! १५ सप्टेंबरला मोफत सर्व रोग तपासणी, औषधोपचार, रक्तदान; चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत

नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात आरोग्यसेवेचा महायज्ञ!


१५ सप्टेंबरला मोफत सर्व रोग तपासणी, औषधोपचार, रक्तदान; चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत

सांगोला (वार्ताहर) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांगोला तालुका शिवसेना आणि

 माणगंगा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

माणगंगा परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते

 सायंकाळी ५ वाजेपर्यंत माणगंगा अॅग्रो मार्ट, वाढेगाव रोड, कडलास नाका, सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरात मेडिसिन, हृदयरोग, मूत्ररोग, सर्जरी, कान-नाक-घसा, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग तसेच नेत्ररोग अशा विविध विभागांतील

 तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. नेत्ररोगासाठी नॅब नेत्र रुग्णालय, मिरज येथील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार आहे.

शिबिरामध्ये रक्त तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, ईसीजी तसेच आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 

याशिवाय नागरिकांसाठी रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सांगोला तालुक्यातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो. ८६०५३४६९६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments