Breaking News

कडलासच्या मान नदीपात्रात वाळूची बेकायदा वाहतूक; ट्रॅक्टरसह ४.०७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

कडलासच्या मान नदीपात्रात वाळूची बेकायदा वाहतूक; ट्रॅक्टरसह ४.०७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात


सांगोला : कडलास येथील गायकवाड वस्ती परिसरातील मान नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

 या कारवाईत महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टर, डंप ट्रॉली आणि वाळू असा तब्बल ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सांगोला/वड्डेगाव पोलीस पथकाने कडलास येथील मान नदीपात्रात पाहणी केली. त्यावेळी नोंदणी क्रमांक नसलेल्या लाल रंगाच्या महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टरमधून अंदाजे एक ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणात विशाल संभाजी गायकवाड (वय २६, रा. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ४ लाख रुपये किमतीचा महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टर व डंप ट्रॉली, तसेच अंदाजे ७ हजार रुपये किमतीची वाळू यांचा समावेश आहे.

मान नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात झालेल्या या कारवाईने परिसरातील वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments