Breaking News

सांगोला तालुक्यात तीन ठिकाणी 100 KVA विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन मा. श्री. अतुल मालक पवार यांच्या विशेष प्रयत्नाला यश

सांगोला तालुक्यात तीन ठिकाणी 100 KVA विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन मा. श्री. अतुल मालक पवार यांच्या विशेष प्रयत्नाला यश


 

सांगोला : जिल्हा नियोजन समिती सोलापूरमधून मा. श्री. अतुल मालक पवार (जिल्हा परिषद सदस्य) यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2025-26 अंतर्गत

 सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये 100 KVA क्षमतेच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले आहे.

या अंतर्गत देवकते वस्ती, सावे येथे देवकते डीपी ते देवकते वस्ती सावे 100 KVA या कामाचे उद्घाटन सकाळी 11.00 वाजता होणार आहे.

तसेच चांदणेगावड इमडवाडी सावे येथे चांदणेगावड डीपी ते बिरगावडे डीपी सावे 100 KVA या विद्युत कामाचा उद्घाटन सोहळा सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय भीमराव वाघमोडे वस्ती, सावे येथे खडतर डीपी ते भीमराव वाघमोडे डीपी सावे 100 KVA या कामाचे उद्घाटन सकाळी 10.00 वाजता होणार आहे.

या विद्युत कामांमुळे संबंधित वस्ती व परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

उद्घाटन सोहळ्यास संबंधित गावांतील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments