Breaking News

युवा सेना तालुका प्रमुख मा. श्री दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट.

युवा सेना तालुका प्रमुख मा. श्री दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे



यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट.

सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. आनंद भाऊ माने व मुख्याधिकारी मा. डॉ. सुधीर गवळी  यांनी  केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 

युवा सेना तालुकाप्रमुख मा.दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जून 2026 रोजी विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे  सांगोला नगरपरिषदेस भेट म्हणून दिली.

  सांगोला नगरपरिषदेच्या वतीने वृक्षांचे शहरातील वासूद चौक ते कडलास नाका रस्त्यावरील दुभाजकामध्ये तसेच न्यू इंग्लिश स्कूल क्रीडा मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी  लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, व  मा. सागर पाटील,  महूद जि प.गटाचे सदस्य दादासाहेब लवटे, पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, तसेच नगरपरिषदेचे सदस्य श्री.काशिलिंग गावडे, श्री अरुण पाटील व  

उदयोगपती बाळासाहेब आसबे, संजयभाऊ केदार इ. मान्यवर  व  नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद(भाऊ) माने यांनी शहरातील इतर नागरिक उद्योजक व्यापारी व सामाजिक संस्थांनाही वाढदिवस,

 वर्धापन दिन यासारख्या विशेष प्रसंगी सांगोला नगरपरिषदेस वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन केले तसेच पुढील पाच वर्षात नगरपरिषदेकडून एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments