Breaking News

मा. दामोदर साठे अध्यक्ष, मा. विनोद रणदिवे उपाध्यक्षपदी निवड; लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे १०६ व्या जयंती उत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

मा. दामोदर साठे अध्यक्ष, मा. विनोद रणदिवे उपाध्यक्षपदी निवड;


लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे १०६ व्या जयंती उत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

सांगोला : लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती उत्सवानिमित्त सन २०२६–२७ या वर्षासाठी जयंती उत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, 

अध्यक्षपदी मा. दामोदर साठे यांची तर उपाध्यक्षपदी मा. विनोद रणदिवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

याचबरोबर खजिनदारपदी मा. दीपक रणदिवे आणि सचिवपदी मा. सचिन रणदिवे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर समाजातील नागरिक, कार्यकर्ते व अण्णा भाऊ साठे प्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि मानवतेचा दिलेला विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल,

 असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच जयंती उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, युवकांमध्ये जनजागृती आणि समाजात ऐक्याची भावना दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक :

जगन्नाथ फाळके

माजी अध्यक्ष

डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव कमिटी, सांगोला

Post a Comment

0 Comments