Breaking News

स्व. आबासाहेबांच्या कार्यपद्धतीचा वारसा; दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची गरज नाही – भाई चंद्रकांत सरतापे

स्व. आबासाहेबांच्या कार्यपद्धतीचा वारसा; दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची गरज नाही – भाई चंद्रकांत सरतापे


सांगोला | प्रतिनिधी "स्वर्गीय आमदार आबासाहेब देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत कधीही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेतले नाही. 

त्यांच्याच विचारांचा आणि कार्यशैलीचा वारसा पुढे नेत विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख देखील श्रेयाच्या राजकारणापासून दूर राहून प्रत्यक्ष विकासकामांवर भर देत आहेत," असे मत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.

सरतापे म्हणाले की, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे मतदारसंघातील विविध प्रश्नांचा सातत्याने अभ्यास करून प्रत्येक मंगळवार आणि बुधवारी मंत्रालयात जाऊन

 संबंधित मंत्र्यांची भेट घेतात. केवळ निवेदने देऊन न थांबता प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

शिरभावी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणे, विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर करणे, सुतगिरणीसाठी परतावा मिळवून देणे,

 दिघंची–वाणी चिंचाळे–भोसे रस्त्यासाठी निधी, तसेच अनेक डीपी मंजूर करून घेणे अशी अनेक विकासकामे त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांशी असलेल्या समन्वयामुळे मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विधानसभेत जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यामुळे आमदार देशमुख यांना सभागृहात वारंवार बोलण्याची संधी मिळाली असून, शासनाकडूनही त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सरतापे यांनी सांगितले.

"आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख दिवसातील १७ ते १८ तास जनतेमध्ये राहून काम करतात. पाऊस असो वा इतर संकट, ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतात. त्यामुळे त्यांच्या कामाची चर्चा गावागावात होत

 असून, जनताच त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करत आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांना कोणतीही गरज नाही," असेही भाई चंद्रकांत सरतापे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments