Breaking News

सांगोल्यात जपानी तंत्रज्ञानाची एंट्री! YANMAR 235 A फोर व्हिल ड्राईव्ह ट्रॅक्टरचे लोकार्पण; "आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शेतीची प्रगती अशक्य" – माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील

सांगोल्यात जपानी तंत्रज्ञानाची एंट्री!


YANMAR 235 A फोर व्हिल ड्राईव्ह ट्रॅक्टरचे लोकार्पण;

"आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शेतीची प्रगती अशक्य" – माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील

सांगोला : शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि आधुनिक करण्याच्या दिशेने सांगोला तालुक्यात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. 

वाढेगावचे माजी उपसरपंच तथा नवोद्योजक अनिलभाऊ दिघे यांच्या ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्स, 

सांगोला शोरूममध्ये जपानी तंत्रज्ञानावर आधारित YANMAR 235 A फोर व्हिल ड्राईव्ह या अत्याधुनिक ट्रॅक्टरचे 

लोकार्पण माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या प्रसंगी अरविंदभाऊ केदार, उद्योगपती महादेव दिघे, डॉ. मानसिंगराव बाबर, 

YANMAR कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, वितरक आणि तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन व अनावरण करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले 

की, "आजच्या स्पर्धेच्या युगात शेती टिकवायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. 

YANMAR 235 A हा ट्रॅक्टर कमी इंधनात अधिक काम करणारा, मजबूत आणि बहुउपयोगी असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचवून उत्पादन वाढविण्यास मदत करेल."

त्यांनी पुढे सांगितले की, अनिलभाऊ दिघे यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जागतिक दर्जाचे जपानी तंत्रज्ञान उपलब्ध करून देत 

कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. या आधुनिक यंत्रसामग्रीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी YANMAR 235 A ट्रॅक्टरची प्रत्यक्ष पाहणी करून त्यातील आधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांची माहिती घेतली. 

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरची कार्यक्षमता, इंधन बचत, विविध शेतीकामांतील उपयोगिता आणि विक्रीपश्चात सेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि अत्याधुनिक कृषी 

यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत अनिलभाऊ दिघे यांचे विशेष अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments