Breaking News

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील रस्त्यांसाठी ७ कोटी निधी मंजूर

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील रस्त्यांसाठी ७ कोटी निधी मंजूर


सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

हा निधी तालुक्यातील विविध गावांमधील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि खेड्यांतील जोड रस्त्यांच्या सुधारणेसाठी वापरला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.श्री. जयकुमार गोरे यांच्या कडे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सदरचा निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी

 अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांनी तत्काळ निधी मंजूर केला 

असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

सदरच्या मंजूर रस्त्यांमध्ये सांगोला तालुक्यातील (शिरभावी) मांजरी सावे इमडेवाडी रस्ता, (भोपसेवाडी) मानेवाडी रस्ता, (घेरडी) मानेवस्ती ते ग्रामा १९० रस्ता, 

ढोलेमळा रस्ता ते संगेवाडी,  इजिमा ५५ ते मेडशिंगी रस्ता,  सोनंद मासाळवस्ती ते आगलावेवाडी रस्ता, गौडवाडी जुजारपूर

 गुणाप्पाचीवाडी ते वाळेखिंडी ते जि. हद्द रस्ता,  हतीद ते ह. मंगेवाडी रस्ता, पाचेगांव बु. ते किडबिसरी रस्ता, कोळे ते बाणुरगड रस्ता,

 महुद ते (हलदहीवडी) इजिमा ९१ रस्ता,  रामा १२४ ते (शिवणे म्हसोबा देवस्थान) प्र.१८२ रस्ता, शिवणे घाडगेवस्ती ते हलदहिवडी रस्ता, 

वाकी घेरडी निमग्रेवाडी ते कडलास रस्ता या कामांना प्रत्येकी ५० लाख असे एकूण ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीमुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. सध्या अनेक गावांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब 

असल्याने शेतमाल बाजारात नेणे कठीण होत होते. या विकासकामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सदरचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 

यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments