सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोठी दुर्घटना, विहिरीत पिकअप
कोसळून ८ जण ठार; दुर्घटनेत ६ महिन्यांचा चिमुकलाही दगावला, मृतांची नावे समोर
सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माळशिरस येथे पिकअप गाडी विहरीत कोसळली आहे.
या अपघातात पिकअप गाडीतील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरिकांना यश आलं आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येदेखील अशीच एक घटना समोर आली होती.
नाशिकची घटना ही रात्री घडली होती. पण माळशिरसची घटना ही भर दिवसा घडली आहे. या घटनेत 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
सर्व 14 जण सोलापूरच्या रांजणीगावचे रहिवासी आहेत. ते देवदर्शनाला गेले होते, अशी माहिती समोर येत आहे.
संबंधित अपघाताची घटना ही माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात विहीर आहे.
ही विहीर रस्त्याच्या शेजारीच आहे. या विहिरीला फार मोठे कठडे नाहीत. तसेच ती काठोकाठ पाण्याने भरली आहे. याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली आहे.
हा अपघात नेमका कसा घडला? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण भर दिवसा ही अपघाताची घटना घडली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे. घटनेत तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
म्हसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी रांजणीगावचे 14 जण पिकअपने गेले होते.
दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना अपघात होऊन 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशित हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली.
स्थानिकांनी तातडीने मदत कार्याला सुरुवात केली. तसेच पोलीस आणि इतर सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले.
विविध लोकप्रतिनिधी घटनास्थळाच्या दिशेला रवाना झाले आहेत. या घटनेमुळे सर्वजण सुन्न झाले आहेत.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. "माळशीरस तालुक्यात अपघात झाला आहे.
तिथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. मी आता त्या ठिकाणी भेट द्यायला निघालो आहे.
त्या ठिकाणी शासकीय मदत जेवढ्या लवकर मिळवता येईल असे प्रयत्न आमचे राहतील", अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
"तांदूळवाडीपासून 4 किमी अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक विहीर आहे. त्या विहिरीत ही घटना घडली आहे.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अपघातग्रस्त गाडीत चार लहान मुलं, चार महिला होत्या.
त्यांचा अंत झाला आहे आणि दोन पुरुष वाचले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
मी घटनास्थळी पोहोचत आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आपल्याला माहिती देतो", अशी माहिती उत्तम जानकर यांनी दिली.





0 Comments