Breaking News

वाढदिवसाचा सामाजिक संकल्प! गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रक्तदान महासंकल्प दिवस’; रक्तदान शिबिरासह वृक्षारोपणाचे आयोजन

वाढदिवसाचा सामाजिक संकल्प! गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रक्तदान महासंकल्प दिवस’;


रक्तदान शिबिरासह वृक्षारोपणाचे आयोजन

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील लोकप्रिय युवा नेते तथा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त 

सोमवार, दि. १५ जून रोजी ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ साजरा करण्यात येणार असून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे मित्रपरिवार, सांगोला तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर माजी 

आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना पक्षाच्या विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाजवळ संपन्न होणार आहे.

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत यंदाही रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे.

 रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदतीचा हात मिळावा तसेच युवकांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे हे मित्रपरिवार, कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दिवसभर माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

चौकट : समाजसेवेचा संदेश देणारा वाढदिवस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनतेच्या मनातील नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आलेला

 हा ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरणार आहे. रक्तदानाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments