"आठ दिवसांत भारनियमन कमी करा;
अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू" – दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा
वीजटंचाई, पाणीप्रश्न आणि ग्रामपंचायत निवडणुकांवर कार्यकर्ता मेळाव्यातून आबांचा सरकार व प्रशासनावर निशाणा
सांगोला : तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत
असून या गंभीर प्रश्नावर आता माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आठ दिवसांच्या आत भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.
सांगोला येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तालुक्यातील वीज व पाणीटंचाईच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाढत्या भारनियमनामुळे शेतातील पिके व फळबागांचे नुकसान होत असून दूध व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनावरांचे दूध काढण्याच्या वेळेस वीज नसल्याने पशुपालकांना हाताने धारा काढाव्या लागत असून त्यामुळे उत्पादन घटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या भीषण उन्हाळ्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे संकटही गडद झाले आहे. टेंभू, म्हैसाळ व नीरा उजवा कालव्याचे पाणी उपलब्ध झाले असले
तरी कोयना धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुढील काळात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने
राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट करत पुढील राजकीय दिशा कार्यकर्त्यांच्या मतानुसार ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनीही तालुक्यातील वीज व पाणी समस्यांवर चिंता व्यक्त केली.
कार्यकर्त्यांनी गटबाजी विसरून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे तसेच शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला जयमालाताई गायकवाड, पूनमताई इंगवले, तानाजीकाका पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे,
गणेश बनकर, सखाराम तंडे, राम बाबर, अरुण घुले, डॉ. सुदर्शन इंगवले, दिलीप नागणे, चंद्रकांत कारंडे,
विजयकुमार शिंदे, समीर पाटील, विजय येलपले, डॉ. राज मिसाळ यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
महावितरणला आठ दिवसांचा अल्टिमेटम
बैठकीत सर्वानुमते ठराव करून सोमवारी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
त्यानंतरही भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्थानिकांना मोकळे अधिकार
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय आघाड्या, उमेदवारी आणि स्थानिक राजकीय समीकरणांबाबत
निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांनाच देण्यात आल्याचे दिपकआबा यांनी जाहीर केले.
आढावा बैठकीला जाहीर सभेचे स्वरूप
अवघ्या काही तासांच्या नोटिशीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीला सांगोला शहरासह तालुक्यातील आबा समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह पाहता बैठकीचे रूपांतर जाहीर सभेत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
"आठ दिवसांत भारनियमन कमी करा; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू" – दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा
उपशीर्षक :
वीजटंचाई, पाणीप्रश्न आणि ग्रामपंचायत निवडणुकांवर कार्यकर्ता मेळाव्यातून आबांचा सरकार व प्रशासनावर निशाणा
सांगोला : तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत
असून या गंभीर प्रश्नावर आता माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आठ दिवसांच्या आत भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.
सांगोला येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तालुक्यातील वीज व पाणीटंचाईच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाढत्या भारनियमनामुळे शेतातील पिके व फळबागांचे नुकसान होत असून दूध व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनावरांचे दूध काढण्याच्या वेळेस वीज नसल्याने पशुपालकांना हाताने धारा काढाव्या लागत असून त्यामुळे उत्पादन घटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या भीषण उन्हाळ्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे संकटही गडद झाले आहे. टेंभू, म्हैसाळ व नीरा उजवा कालव्याचे पाणी उपलब्ध झाले
असले तरी कोयना धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुढील काळात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पराभवाने खचून न
जाता नव्या जोमाने राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट करत पुढील राजकीय दिशा कार्यकर्त्यांच्या मतानुसार ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनीही तालुक्यातील वीज व पाणी समस्यांवर चिंता व्यक्त केली.
कार्यकर्त्यांनी गटबाजी विसरून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे तसेच शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला जयमालाताई गायकवाड, पूनमताई इंगवले, तानाजीकाका पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, गणेश बनकर,
सखाराम तंडे, राम बाबर, अरुण घुले, डॉ. सुदर्शन इंगवले, दिलीप नागणे, चंद्रकांत कारंडे, विजयकुमार शिंदे,
समीर पाटील, विजय येलपले, डॉ. राज मिसाळ यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
महावितरणला आठ दिवसांचा अल्टिमेटम
बैठकीत सर्वानुमते ठराव करून सोमवारी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
त्यानंतरही भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्थानिकांना मोकळे अधिकार
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय आघाड्या, उमेदवारी आणि
स्थानिक राजकीय समीकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांनाच देण्यात आल्याचे दिपकआबा यांनी जाहीर केले.

0 Comments