बांधकाम मंडळाच्या योजनेत लाचेचा सापळा; उपळाई येथे दोन ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर : बांधकाम कामगारांना घरगुती भांडी देण्याच्या योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोन जणांना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. उपळाई (ता. माढा) येथे ही कारवाई करण्यात आली.
माहितीनुसार, तक्रारदाराकडून घरगुती भांडी मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला १२०० रुपयांची मागणी करण्यात आली होती.
मात्र चर्चेनंतर ही रक्कम ५०० रुपयांवर ठरल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी १६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने ६ मे रोजी सापळा रचला.
यावेळी तक्रारदाराकडून ४०० रुपयांची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
विनोद विजय गाडेकर (वय ३७) – ऑपरेटर, माती वाटप केंद्र, उपळाई
दिनेश मनोहर वाघमारे (वय २३) – ऑपरेटर, माती वाटप केंद्र, उपळाई
या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शैलेश पवार आणि त्यांच्या पथकाने सापळा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे
की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी पैशांची मागणी करत असल्यास तातडीने ९८२३२२५४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.


0 Comments