स्व. राजाराम नाईकनवरे यांच्या पुण्यस्मरणातून समाजसेवेचा वसा जिवंत; पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
पंढरपूर : संतपेठ परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते स्वर्गीय राजाराम नाईकनवरे उर्फ दादा यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्व. नाईकनवरे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपत प्रतिष्ठान, सामाजिक संस्था व मित्रपरिवाराच्या वतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.
स्व. राजाराम नाईकनवरे हे संतपेठ व परिसरात प्रेमळ, मनमिळाऊ आणि गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली होती. बहुजन समाजाला एकत्र घेऊन समाजहिताचे कार्य करण्याचा त्यांचा ध्यास होता.
“देशसेवा हीच खरी समाजसेवा” हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व, साधेपणा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे
समाजात त्यांना मोठा मान-सन्मान मिळाला होता. युवकांनी त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घ्यावा, अशी भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
स्व. नाईकनवरे यांनी आपल्या कुटुंबातही देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजवले. एक मुलगा देशाच्या सीमेवर भारतमातेचे रक्षण करत असताना
दुसरा समाजसेवेत कार्यरत असल्याचा अभिमान उपस्थितांनी व्यक्त केला.
पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर शहरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणपोई सुरू करण्यात आली. तसेच गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात वृद्ध माता-पित्यांसाठी मिष्टान्न
भोजन व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याशिवाय माऊली शहरी बेघर निवारा केंद्रातील गरजू नागरिकांनाही भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमाला भैरवनाथ शुगर समूहाचे चेअरमन मा. अनिलदादा सावंत, नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके,
पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगवणे, कॅप्टन प्रदीपकुमार मोरे, इंजिनिअर नागनाथ पांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व रूपरेषा प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक
कार्यकर्ते दिपक राजाराम नाईकनवरे, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान, सामाजिक संस्था व मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.











0 Comments