सांगोल्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू; ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी निधनाची नोंद
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात ९ मे २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची नोंद ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत ज्ञानेश्वर सतीश माने (वय ३९, रा. बागलवाडी, ता. सांगोला) यांनी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयातून पोलिसांना वर्दी पाठविण्यात आली असून, नोंद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ/138 भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय २८, रा. कडलास, ता. सांगोला) यांचा एखतपूर पाटीजवळ अपघात झाला.
जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
याबाबतही पोलिसांना कळविण्यात आले असून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/1242 बनसोडे करीत आहेत.
दोन्ही प्रकरणांबाबत संबंधित पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments