Breaking News

सांगोला - दिघेवाडी येथे ट्रॅव्हल्स बसचा थरारक अपघात; ३५ प्रवासी जखमी, १०८ रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली


सांगोला - दिघेवाडी येथे ट्रॅव्हल्स बसचा थरारक अपघात;

३५ प्रवासी जखमी, १०८ रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

सांगोला (प्रतिनिधी) : नांदेडहून कोल्हापूरकडे जाणारी अशोका ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्र. एम.एच.०९ ई.एल.४५२७) शुक्रवारी मध्यरात्री दिघेवाडी शाळेजवळ रस्त्याच्या कडेला

 असलेल्या खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात बसमधील ४० पैकी ३५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी २३ जण गंभीर जखमी असल्याचे समजते.

 तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. 

त्यानंतर १०८, १०२ आणि १०३३ रुग्णवाहिका सेवा तसेच खासगी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. 

१०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आणि पायलट यांनी समन्वयाने गंभीर जखमींना प्राथमिक उपचार देत रुग्णालयात दाखल केले. 

तातडीच्या प्रतिसादामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

जखमी प्रवासी विशाल वामनराव साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अपघातामुळे ट्रॅव्हल्सचे अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून खासगी प्रवासी वाहनांची नियमित तपासणी, फिटनेस आणि नियमपालनाबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments