शिवणे येथे दादासाहेब घाडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शिवणे (ता. सांगोला) येथे लोकनियुक्त सरपंच श्री. दादासाहेब घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दादासाहेब घाडगे यांच्या समाजकारणातील सक्रिय सहभागाचे व गावाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
ग्रामविकास, लोकसेवा आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळे त्यांनी परिसरात विशेष ओळख निर्माण केली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्यास माजी आमदार मा. शहाजीबापू पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक,
विविध गावांतील सरपंच, पदाधिकारी, हितचिंतक, नातेवाईक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांच्या शुभेच्छांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा, जनसहभाग आणि विकासाभिमुख कामकाजाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
दादासाहेब घाडगे यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


0 Comments