Breaking News

घरात घुसून अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षांची कठोर शिक्षा; न्यायालयाचा दणदणीत निकाल सोलापूर जिल्ह्यातील घटना..

घरात घुसून अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षांची कठोर शिक्षा;


न्यायालयाचा दणदणीत निकाल सोलापूर जिल्ह्यातील घटना..

कुर्डुवाडीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस 20 वर्षांची सक्तमजुरी

सोलापूर : कुर्डुवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याप्रकरणी बार्शी येथील सत्र न्यायालयाने 

आरोपीला 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो कायदा आणि संबंधित कलमांन्वये दोषी ठरवत न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे.

ही घटना 1 जानेवारी 2025 रोजी घडली होती. रात्रीच्या सुमारास 14 वर्षीय मुलगी घरात झोपलेली असताना आरोपी लखन उर्फ बापू जोतीराम सावंत याने घरात प्रवेश केल्याचा आरोप होता.

 घटनेनंतर मुलीने प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले.

खटल्याची सुनावणी अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(2) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध

 झाल्यानंतर न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी, दंड आणि इतर शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारी पक्षातर्फे अॅड. दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेचे निवेदन,

 तिचा न्यायालयातील जबाब आणि इतर पुरावे परस्परांना पूरक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. घटनेनंतर आरोपीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची बाबही महत्त्वाची ठरली.

या निकालामुळे महिला व बालकांवरील गुन्ह्यांविरोधात न्यायव्यवस्थेचा कठोर दृष्टिकोन अधोरेखित झाला असून, प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments