सांगोला–महूद रस्त्यावर भीषण अपघात;
पिकअप चालकाचा मृत्यू, एसटीतील प्रवासी जखमी
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला ते महूद मार्गावरील चिंचोली तलावाजवळ शनिवारी (दि. 09/05/2026) पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास एसटी बस
आणि महिंद्रा पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 400/2026 नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी चैतन्य शिवाजी व्हरगर (वय 35, रा. महिम, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एसटी बस (क्रमांक MH 13 CU 8126) पुण्याकडे जात असताना
महिंद्रा पिकअप (क्रमांक MH 14 FT 1002) चा चालक पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय 28, रा. कडलास, ता. सांगोला) याने भरधाव वेगात, रस्त्याची परिस्थिती न पाहता वाहन चालवून बसला धडक दिली.
या अपघातात बसमधील श्रीमती श्रद्धा पोरे, प्रवासी अश्विनी इंगोले व इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले
असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका/1242 बनसोडे करत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोहेका/493 माने यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आली आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



0 Comments