Breaking News

“झाडांसाठी आमदारांचा पुढाकार; विकासासाठी राजकारण बाजूला ठेवा” — आ. डॉ. बाबासाहेब देशमुख चोपडीतील १८ हजार झाडांना पाणी देण्यासाठी स्वतःच्या पगारातून मदत जाहीर

“झाडांसाठी आमदारांचा पुढाकार; विकासासाठी राजकारण बाजूला ठेवा” — आ. डॉ. बाबासाहेब देशमुख


चोपडीतील १८ हजार झाडांना पाणी देण्यासाठी स्वतःच्या पगारातून मदत जाहीर

सांगोला / तालुका प्रतिनिधी : चोपडी गावातील १८ हजार झाडे वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी 

सांगोला वन विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले असताना, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेत 

झाडांच्या संगोपनासाठी स्वतःच्या पगारातून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी “गावाच्या विकासासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे,” असे आवाहन केले.

यावेळी बोलताना त्यांनी गाव तलावाच्या सुशोभीकरणाचाही मुद्दा उपस्थित केला. “सिद्धनाथ यात्रेमुळे तलाव पाण्याने भरला असला

 तरी भविष्यात अधिक पाणी साठवता यावे यासाठी तलावाचे सुशोभीकरण आणि आवश्यक कामे लवकरच करण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात ट्रॅक्टर शर्यत, खिलार बैल व गाय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

याचवेळी “शिवबा हेच का आपले सुराज्य” या भव्य नाटकाचे उद्घाटन संतोष बाबर, नंदू बाबर, शरद बाबर, दत्ता बाबर, बाळासो बाबर व माजी सरपंच सुरेश बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य दादासो बाबर, आबा बाबर, संतोष बाबर, सिद्धनाथ मंदिरचे राजाराम बाबर, रामचंद्र केंगार, माऊली बाबर, डॉ. नवनाथ बाबर,

 जनार्दन बाबर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्योजक सतीश पाटील यांनी केले तर आभार गणेश बाबर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments