आगलावेवाडीत घरफोडी; सुमारे २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला, सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल
सांगोला : तालुक्यातील आगलावेवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दत्तात्रय भाउसाहेब काशीद (वय ४७, रा. आगलावेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
१० मे २०२६ रोजी रात्री ते ११ मे २०२६ रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली.
घर उघडे असल्याचा फायदा घेत चोरट्याने सोन्याचे विविध दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १.५ तोळ्याची ओम लॉकेट असलेली सोन्याची चैन (७५,००० रुपये), १ तोळ्याची पिळ्याची अंगठी (५०,००० रुपये),
अर्धा तोळ्याची खड्याची अंगठी (२५,००० रुपये) आणि १ तोळ्याची आणखी एक पिळ्याची अंगठी (५०,००० रुपये) यांचा समावेश आहे.
एकूण सुमारे २ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बीएनएस कलम ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१४/२०२६ आहे.
पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे सपोनि मोरे करत आहेत. गुन्हा दाखल करून प्रकरणाचा अहवाल न्यायालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, घरात आणखी काही वस्तू चोरीला गेल्या आहेत का याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


0 Comments