Breaking News

NEET 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणानंतर नव्याने आयोजनाचा निर्णय

NEET 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणानंतर नव्याने आयोजनाचा निर्णय


नवी दिल्ली : देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी महत्त्वाची NEET परीक्षा केंद्र सरकारने रद्द केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 

3 मे 2026 रोजी पार पडलेली ही परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिनोन्‌महिने केलेली तयारी पुन्हा नव्याने परीक्षेसाठी करावी लागणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, परीक्षेतील कथित गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

परीक्षा नव्याने आयोजित केली जाणार असून त्याबाबतची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments