महूद गावच्या मुख्य चौकातील गटार बांधकाम फुटले..
नागरिकांच्या जीवितास धोका गटार बांधकामात मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याची नागरिकांतून चर्चा..
सांगोला प्रतिनिधी- महूद गावातून जाणाऱ्या पंढरपूर- मल्हारपेठ राज्य मार्गावरील उत्तर व दक्षिण बाजूचे गटार बांधकाम फुटले, गटार बांधकामास मोठ मोठे तडे गेले
असून हे गटार बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
हे गटार बांधकाम पूर्ण निकृष्ट झाल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे. या विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. महूद गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक
बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्या कार्यालयामध्ये जाऊन याचा जाब विचारला असता त्यांनी आम्ही पाहणी करून
लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आश्वासन दिलेले आहे. परंतु झालेले गटार बांधकाम कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे
उपअभियंता व अन्य अधिकारी यांच्यामध्ये काही आर्थिक साठे लोटे होऊन या कामात टक्केवारी खाऊन कामात भ्रष्टाचार करण्यात आला आहे
अशे नागरिकांतून बोलले जात आहे. काही व्यवसायिकांच्या दुकानापुढे गटार बांधकाम फुटल्यामुळे त्या
व्यवसायिकांनी स्वतःच्या पैशातून गटर दुरुस्ती केलेली आहे. या राज्य मार्गावरती असणारे व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक,
प्रवासी यांना गटार दुरुस्ती न केल्यामुळे जीवितास धोका व त्यातून येणारा उग्र वास, डासांचा त्रास होतो आहे.
तक्रार करून देखील दुरुस्तीचे काम होत नसेल तर काही सामाजिक कार्यकर्त्याकडून त्या विभागाच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे.
चौकट- महूद गावातील गटार बांधकामाची लवकरात लवकर पाहणी करून आम्ही दुरुस्त करून देऊ.. बी.एम.मिटकरी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर
चौकट- गटार बांधकाम फुटल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे व त्यामध्ये कचरा व घाण पाणी साठल्यामुळे डास निर्माण झाले आहेत
व उग्र वास येत आहे विनाकारण या विभागाकडून व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जातोय याची दखल लवकर नाही घेतली तर आम्ही मोठे जनआंदोलन करू..


0 Comments