Breaking News

सांगोला रोडवर भीषण अपघात; भरधाव आयशरच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

सांगोला रोडवर भीषण अपघात; भरधाव आयशरच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू


वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलिस ठाणे हद्दीत सांगोला रोडवरील घुमेरा ओढ्यानजिक शुक्रवारी (दि. 15 मे) सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या 

भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेरी येथील तानाजी शहाजी माने देशमुख आणि त्यांच्या पत्नी जयश्री तानाजी माने देशमुख हे दुचाकीवरून प्रवास करत होते. 

त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने (क्रमांक MH 10 AW 4670) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दोघांचे शव वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

 त्यानंतर रात्री उशिरा शेरी नंबर 1 येथील त्यांच्या राहत्या घरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. 

तसेच संबंधित आयशर टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Post a Comment

0 Comments