“एकाच फोनवर प्रश्न सुटला!” – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्तक्षेपाने बुध्याळ तलावातून बंधाऱ्यात पाणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक घटना समोर आली आहे.
बलवडी येथील धायगुडे वस्तीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता.
अखेर ग्रामस्थांनी सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी थेट संपर्क साधत मदतीची विनंती केली.
ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत आमदार देशमुख यांनी तात्काळ हालचाल करत बुध्याळ तलावाशी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे सूचना दिल्या.
त्यांच्या ठाम शब्दांना मान देत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत बुध्याळ तलावातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे बलवडी धायगुडे वस्तीवरील बंधाऱ्यात प्रथमच पाणी पोहोचले असून, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या या पाण्यामुळे शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे.
या जलद आणि प्रभावी हस्तक्षेपाबद्दल सर्व ग्रामस्थांकडून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत.
“एक कॉल – प्रॉब्लेम सॉल” अशीच प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत असून, आमदार देशमुख यांच्या कार्यशैलीचे कौतुक होत आहे.


0 Comments