Breaking News

जनसेवेच्या वाटचालीत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख दांपत्याचा सहप्रवास; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

जनसेवेच्या वाटचालीत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख


दांपत्याचा सहप्रवास; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आणि लाडके आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच त्यांच्या सहचारिणी 

डॉ. निकिताताई देशमुख यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून डॉ. बाबासाहेब देशमुख यांची ओळख आहे.

 त्यांच्या कार्यशैलीमुळे सांगोला तालुक्यात विकासाला नवी दिशा मिळाली आहे. त्याचबरोबर डॉ. निकिताताई देशमुख या देखील खांद्याला खांदा लावून सामाजिक 

आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेत असून मतदारसंघात सातत्याने जनतेशी संपर्क ठेवत आहेत.

या दांपत्याने जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केलेल्या अथक परिश्रमामुळेच ते 

नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले आहेत. त्यांच्या सहजीवनाचा हा वाढदिवस प्रेरणादायी असून, 

पुढील आयुष्यातही त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक यश लाभो, अशा शुभेच्छा विविध स्तरातून व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments