Breaking News

“सांगोला ठप्प! तलाठी संपाचा चौथा दिवस; ७/१२ ते जात दाखले सर्व कामे रखडली "

“सांगोला ठप्प! तलाठी संपाचा चौथा दिवस; ७/१२ ते जात दाखले सर्व कामे रखडली "


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : तालुक्यातील महसुली यंत्रणा अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

 तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आज चौथा दिवस असून, नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

२१ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. उत्पन्न दाखले, 

जात प्रमाणपत्र, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी यांसारखी अत्यावश्यक कामे ठप्प पडली आहेत. 

याचा सर्वाधिक फटका शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 

मात्र, अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तहसील कार्यालय परिसरात शुकशुकाट असून, कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे, शेतकऱ्यांचे जमीन व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचे अर्ज प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

👉 प्रशासनाकडे नागरिकांची मागणी:

संपाचा कालावधी वाढत असल्याने नागरिकांची अडचण टोकाला पोहोचली आहे. 

त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचारी व सरकार यांच्यात समन्वय साधावा आणि महसुली सेवा त्वरित सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments