सांगोल्यात जानकरांचा जल्लोष! 58 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा
सांगोला (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरात उद्या,
शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा मदने चौक (वंदे मातरम चौक), महुद रेल्वे गेटजवळ पार पडणार असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास घेत महाराष्ट्राच्या राजकारणात
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे जानकर हे लढाऊ आणि स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी
“यू आर नॉट डिमांडर, यू आर कमांडर” ही भूमिका मांडत अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात संधी दिली आहे.
या विशेष दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय समाज पक्ष व जानकर प्रेमींच्या वतीने त्यांना 58 हजार रुपयांची थैली सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल (दादा) शेंडगे यांनी केले आहे.
सांगोल्यातील हा सोहळा राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, मोठ्या गर्दीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 Comments